Saturday, 27 August 2016

!! श्री स्वामी समर्थ !!

मी (आदित्य अरुण भागवत)पौरोहित्य करत नाही मात्र वास्तू शास्त्रज्ञ म्हणून चांगले काम करण्यासाठी त्यासंबंधित वास्तू शांति, ग्रूहप्रवेश, गणेश पूजन यांची माहीती असावी म्हणून हिंगे गुरुजींच्या मार्गदर्शनात बरेचसे पौरोहित्य शिकलो.

मी पौरोहित्य का करत नाही याची अनेक कारणे आहेत पण आज तो विषय नाही तर आता येणार्‍या गणेशोत्सवात गुरुजी न मिळाल्यास काय करता येईल याबद्दल माहीती देणे हा आजच्या लेखाचा उद्देश आहे.

चांगल्या गुरुजींचीसुध्दा या दिवशी फार दमछाक होते शिवाय़ घरोघरी गणपती बसू लागल्याने पौरोहित्याची जाण असलेल्यांची संख्या पुरेशी ठरत नाही. त्यामूळे या लोखात थोडक्यात गणपती पूजनाची माहीती देण्याचा प्रयत्न आहे
सर्व प्रथम "वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषू सर्वदा" हा मंत्र म्हणावा. याचा अर्थ असा आहे कि हे बक्रतुंडा (गणपतीचे नाव) तूझे महान रुप कोटि कोटि सुर्यांच्या प्रमाणे तेजोमान आहे तू हे सर्व कार्य निर्विघ्न पार पाड
.
पुढे संध्या करावी. अर्थातच संध्या करणे म्हणजे दोनदा आचमन करुन विष्णूची २४ नावे घेणॆ
ॐ केशवाय नम:! ॐ नारायणाय नम:! ॐ माधवाय नम:! या तीन नावांचा उच्चार करत प्रत्येकी पळीभर पाणी उजव्या हाताने पिणे

त्यानंतर
ॐ गोविंदाय नम:! असे म्हणत पाणी ताम्हनात सोडून देणे
हिच क्रिया पून्हा एकदा करावी आणि मग विष्णूंची पुढील २४ नामे हात जोडून म्हणावी
ॐ केशवाय नम:! ॐ नारायणाय नम:!
ॐ माधवाय नम:! ॐ गोविंदाय नम:!
ॐ विष्णवे नम:! ॐ मधूसुधनाय नम:!
ॐ त्रिविक्रमाय नम:! ॐ वांअनाय नम:!
ॐ श्रीधराय नम:! ॐ ऋषीकेशाय नम:!
ॐ पद्मनाभाय नम:! ॐ दामोदराय नम:!
ॐ संकर्षणाय नम:! ॐ वासूदेवाय नम:!
ॐ प्रदुम्नाय नम:! ॐ अनिरुध्दाय नम:!
ॐ पुरुषोत्त्तमाय नम:! ॐ अधोक्षजाय नम:!
ॐ नरसिंहाय नम:! ॐ अच्यूताय नम:!
ॐ जनार्दनाय नम:! ॐ उपेंद्राय नम:!
ॐ हरये नम:! ॐ श्रीकॄष्णाय नम:!

या नंतर "सुमुखश्च एकदंतश्व्च...........सर्वविघ्नोपशांतयेहे स्तोत्र असून त्यासोबत "सर्वमंगलमागल्ये शिवे सर्वार्थ साधिके......नारायणी नमोस्तूते" "शांताकाराम...... ध्यानगम्यम!" हे देवी आणि विष्णूंचे श्लोक असतात.
त्या नंतर गणेश, कुलदेवी, कुलपुरुष, माता-पिता, मृत पूर्वज, ग्रामदेवता, वास्तू देवता, लक्ष्मी नारायण यांना वंदन करण्यात येते.

इथे संकल्प म्हणावा
"मी सकल शूभ प्राप्तीसाठी आणि अशूभ निवारणासाठी या दिवशी सहकुटुंब, मित्र नातलगांसहित यथाशक्त्ति, माझ्या माहीतीनुसार आणि उपलबध्द पदार्थ वापरुन तूझे पूजन करीत आहे."
(हा मूळ संस्कृत श्लोकाचा स्वैर अनुवाद आहे)

या नंतर गणपतीला पूजेसाठी येण्याची विनंती करावी, पुढे तो आला आहे असे समजून बसण्यासाठी आसन द्यावे, अर्थात आसनावर अक्षता वहाव्यात.
श्री गणेश देवताय नम:! आवाहयामी!
श्री गणेश देवताय नम:! आसनार्थे अक्षतां समर्पयामि !

त्याचे पाय धूण्यासाठी पाणी द्यावे तसेच पिण्यासाठी पाणी द्यावे म्हणजे दोन पळी पाणी ताम्हनात सोडावे.
श्री गणेश देवताय नम:! पाद्यं समर्पयामि ! अर्घ्यं समर्मपयामि !

पूजेप्रित्यर्थ गंध, हळद कूंकू, फुल आणि अक्षता वाहून नमस्कार करावा
श्री गणेश देवताय नम:! विलेपनार्थे चंदनं समर्पयामि!
श्री गणेश देवताय नम:! हरिद्रा कूंकूम सौभाग्य द्रव्य समर्पयामि !
श्री गणेश देवताय नम:! पूष्पं समर्पयामि !
श्री गणेश देवताय नम:! सकलपूजार्थे अक्षतां समर्पयामि!

यानंतर गणेश मूर्तिच्या हृद्याला स्पर्श करुन प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणावा, मूळ संस्कृत मत्र म्हणणे अनेकांना शक्य होणार नाही याची मला कल्पना आहे त्यामूळे त्याला पर्यायी प्रार्थना करावी असे मला वाटते.
"हे गणेशा आम्ही तूला विनंती करतो कि तू या मूर्तीत चैतन्य रुपात विराजमान होऊन आमची पूजा स्वीकार"
(मूळ संस्खृत श्लोकाचा स्वैर अनुवाद)

पुढे आधीचे निर्माल्य काढून बाजूला ठेवावे आणि अथर्वशीर्ष म्हणत थोडा अभिषेक पंचांमृताचा आणि उरलेला अभिषेक साध्या पाण्याने करावा. अभिषेक करण्यासाठी दुर्वा वापरावी.

यानंतर बाप्पााचे निरंजनाने औक्षण करावे तसेच उदबत्ती किंवा धुप त्याच्य़ा भोवती फिरवून घ्यावा. धुप हा केवळ सुगंध निर्मितीच्य़ा दृष्टीने त्याच्या जवळून फिरवावा.
श्रॊ गणेश देवताय नम:! धूपं दर्पयामि ! दिपं दर्शयामि!
यानंतर गणपती बाप्पाला विविध फूले, पत्री वहावीत हार घालायचा असल्यास घालावा. आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा.

हे सर्व झाल कि पून्हा प्रार्थना करावी
:"हे भगवंता आम्हाला तूझी पूजा कशी करावी याचे ज्ञान नाही, आमची भक्त्ति पुरेशी नाही जर आमच्याकडून तूझ्या पूजनात काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर आणि या पूजेला गोड मानून घे आणि आम्हाला रुप, किर्ति, यश दे"

या पध्दतीने पूजा सांगितलेली आहे ती केवळ सामान्य माणसांसाठी ज्यांना गुरुजी उपलब्ध नसतील तर, कारण गुरुजी आल्यास याहून अधिक उपचार समर्पण होऊ शकते.
रोज तीनदा आरती करावी, तीन-चार वेळा आपल्या लादक्या बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
पोस्ट Forward करताना कृपया माझ्या (आदित्य अरुण भागवत) नावासहित Forward करावी, नाव काढून तसेच स्वत:चे नाव टाकून पोस्ट Forward करु नये.
ज्योतिर्भास्कर आणि वास्तू विशारदआदित्य अरुण भागवत(मो.) ९०२९५८१५९०, ९८१९४१५४७८०४ अमोलश्री अपार्टमेंट, भंडार आळी, ज. स. मार्ग, प्रभात सिनेमाजवळ, ठाणे (प)


विसर्जनाच्या दिवशी
त्याचे पाय धूण्यासाठी पाणी द्यावे, पिण्यासाठी पाणी द्याचे, म्हणजेच तांहनात दोन पळी पाणी सोडावे.
श्री गणेश देवताय नम:! पाद्यं समर्पयामि ! अर्घ्यं समर्पयामि !
पूजेप्रित्यर्थ गंध, हळद कूंकू, फुल आणि अक्षता वाहून नमस्कार करावा
श्री गणेश देवताय नम:! विलेपनार्थे चंदनं समर्पयामि!
श्री गणेश देवताय नम:! हरिद्रा कूंकूम सौभाग्य द्रव्य समर्पयामि !
श्री गणेश देवताय नम:! पूष्पं समर्पयामि !
श्री गणेश देवताय नम:! सकलपूजार्थे अक्षतां समर्पयामि!
श्रॊ गणेश देवताय नम:! धूपं दर्पयामि ! दिपं दर्शयामि!

हे सर्व झाल कि पून्हा प्रार्थना करावी
:"हे भगवंता आम्हाला तूझी पूजा कशी करावी याचे ज्ञान नाही, आमची भक्त्ति पुरेशी नाही जर आमच्याकडून तूझ्या पूजनात काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर आणि या पूजेला गोड मानून घे आणि आम्हाला रुप, किर्ति, यश दे"

येवढी पूजा करुन हातात अक्षता घ्याव्यात आणि पुढील मंत्र म्हणावा
"यान्तु देवगणा पूजा मादाय सर्वकाम प्रसिद्यर्थम पूनरागमनायच!"

याचा अर्थ
"हे देवा तू आमची ही पूजा स्वीकारुन आमच्या सर्व कामना पूर्ण कर आणि पून्हा पून्हा आमच्याकडून तूझे असे पूजन व्हावे"
हा श्लोक म्हणून त्या अक्षता बाप्पावर हलकेच टाकाव्यात, मग बाप्पाला विसर्जनाला न्यावे.

विशेष विनंती: मी केवळ ज्योतिष शास्त्रीय मार्गदर्शन आणि विनातोडफोड वास्तू शास्त्र करतो, त्यामूळे पूजेसाठी फोन करु नये हि नम्र विनंती.

ज्योतिर्भास्कर आणि वास्तू विशारदआदित्य अरुण भागवत(मो.) ९०२९५८१५९०, ९८१९४१५४७८०४ अमोलश्री अपार्टमेंट, भंडार आळी, ज. स. मार्ग, प्रभात सिनेमाजवळ, ठाणे (प)

Wednesday, 8 June 2016

!! श्री स्वामी समर्थ !!
आपण १२ राशींचे स्वभाव बघणार आहोत पण आज फक्त मेष राशी बघूया

मेष राशी हि दिसण्यास सावळी, उंच, दणकट असून बोलण्यास रोखठोकपणा सोबत काहीसा फटकळपणा असतो.

अत्यंत कर्तबगार असून स्वत: झटून मेहनत कराय़्ची आणि इतरांनाही तसेच कामाला लावायचे हे यांना चांगले जमते.

घरात किंवा कोठेही शांत बसणे यांना जमत नाही सतत कशात ना कशात स्वत:ला गूंतबून घेतात काही नाही तर कोणाला तरी पकडून गप्पांची मैफील रंगवतात.

अभ्यासात मेष राशी हुशार असतेच, कुठल्याच गोष्टीत मागे पडणे मेष राशीला आवडत नाही, त्यामूले अभ्यासावर मेष राशी चांगले लक्ष केंद्रित करतेच पण त्याचसोबत क्रिडा प्रकारातसुध्दा पुढे असते.

मेष राशीला नोकरीत एकाच ठिकाणी सतत एकच काम करत रहाने आवडत नाही त्यामूले हे वारंवार नोकरी तरी बदलतात किंवा यांच्या कामाचे स्वरुप बदलून घेत रहातात.

हाताखालील माणसांकडून काम करवून घेणे यांना चांगले जमते त्यामूळे यांच्या हाताखाली काम करणारे यांना टरकून असतात.

कोणावरही प्रभूत्व गाजवायला यांना आवड्ते काहीवेळा मेष राशीचे लोक आपल्या जोडीदारावरसुध्दा फार वर्चस्व गाजवतात.
हे अत्यंत धाडसी, साहसी वृत्त्तीचे असतात आनि त्य़ांना काहीवेळा बेफिकीरीमूळे छॊटे मोठे अपघात घडू शकतात.
होमहवन आदी धार्मिक कृत्ये त्यांना प्रिय असतात. तीर्थयात्रा करणे देखील त्यांना फार आवडाते, मेष राशीला प्रवासाची फार आवड असते.

म्रेष राशी अत्यंत कार्यमग्न (Workoholic) असल्याने इतरांना या स्वभावाचा त्रास होतो पण त्यांना त्याचे काही वाटत नाही.
शूरवीरपणा, स्वाभिमानीपणा, करारीपणा, तत्वनिष्ठता, व्यवहारीकता, तापटपणा, उतावळेपणा असे गुण मेष राशीत दिसून येतात.

मेष राशी व्यवहारी असली तरी काहीशी खर्विकवृत्त्तीची असते, जीवनात ऐषोआरामाला थोड जास्त महत्व देणारी हि राशी खाईन तर तूपाशी नाहीतर उपाशी अशी काहीशी वागते.

आता उद्या वृषभ राशी बघूया.
ज्योतिर्भास्कर आणि वास्तू विशारद
आदित्य अरुण भागवत
९०२९५८१५९०, ९८१९४१५४७८
०४, दुसरा मजला, अमोल अपार्ट., भंडार आळी,
ज. स. मार्ग, प्रभात सिनेमाजबळ, ठाणॆ (प)